Ad will apear here
Next
‘उद्योगांनी अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून घेणे आवश्यक’
‘सीएसआयआर’चे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांचे मत
‘डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर’च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राजकुमार खिंवसरा यांना डॉ. शेखर मांडे यांच्या हस्ते सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी रथिन सिन्हा, एच. पी. श्रीवास्तव, प्रकाश धोका, सुरिंदर अगरवाल आदी

पुणे : ‘अत्यंत अद्ययावत असे ‘इंडस्ट्री फोर पाँईंट झीरो’ तंत्रज्ञान, ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि ‘मशीन लर्निंग’ हे आजच्या जगातील परवलीचे शब्द झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील ही आव्हाने असून, लवकरात लवकर त्यांचा सामना करून नवे तंत्रज्ञान अवगत करून घेणे गरजेचे आहे,’ असे मत ‘काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च’चे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले.

‘स्वारोस्की इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक वेर्नर प्लॉनर यांना डॉ. शेखर मांडे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुण्यातील ‘डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर’च्या (डीसीसीआयए) सतराव्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेचा रौप्य महोत्सवदेखील या वेळी साजरा करण्यात आला. ‘डीसीसीआयए’चे अध्यक्ष प्रकाश धोका आणि उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव यांनी या वेळी संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला, तसेच सध्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले. संस्थेचे सचिव रथिन सिन्हा, खजिनदार सुरिंदर अगरवाल, योगेश वाघानी, व्ही. एल. मालू, राजीव लोकरे, पंडित पाळंदे, अनिल गुप्ता आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबरोबरच गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरविणाऱ्या राजकुमार खिंवसरा यांना ‘डीसीसीआयए’तर्फे सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘स्वारोस्की इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक वेर्नर प्लॉनर यांना मांडे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर सहल क्षेत्रातील उद्योजक केसरी पाटील यांना ‘बेस्ट इंडस्ट्रिआलिस्ट’  पुरस्काराने गौरविण्यात आले. केसरी पाटील यांच्या वतीने त्यांच्या कन्या झेलम चौबळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मांडे म्हणाले, ‘उद्योग क्षेत्रास इंडस्ट्री फोर पॉईंट झीरो, आयओटी, आर्टिफिशियल इंटलिजन्स आणि मशीन लर्निंगसंदर्भात मदत करण्यास ‘सीएसआयआर’ नेहमीच तयार आहे. एकत्रितपणे या विषयांमध्ये काम केल्यास देशाच्या प्रगतीला आपण निश्चित हातभार लावू शकू आणि भारताला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देऊ शकू.’

मांडे यांच्या हस्ते या वेळी संस्थेच्या ‘स्पर्श’ या वार्षिक अंकाचेही अनावरण करण्यात आले. या वेळी ‘बेस्ट एचआर प्रॅक्टिसेस अॅवॉर्ड’ ‘वाईका इन्स्ट्रुमेंटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला, तर ‘बेस्ट सेफ्टी प्रॅक्टिसेस अॅवॉर्ड’ ‘इन्फायलूम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला प्रदान करण्यात आला. याबरोबरच ‘ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज लिमिटेड’, ‘केमेटॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एव्हरी डेनिसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला ‘एचआर’ आणि ‘सेफ्टी प्रॅक्टिसेस’ स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZWCCF
Similar Posts
देशातील दुसरे रिट्झ-कार्ल्टन हॉटेल पुण्यात सुरू पुणे : आलिशान हॉटेल्सचा आघाडीचा ब्रँड म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या रिट्झ-कार्ल्टनचे पुण्यात आगमन झाले आहे. भारतातील हे दुसरे रिट्झ-कार्ल्टन हॉटेल आहे. यामुळे आदरातिथ्य क्षेत्रातील पुण्याचे महत्त्व अधोरेखित झाले असून, पुण्याच्या दिमाखात अधिकच भर पडली आहे. येरवडा परिसरातील गोल्फ कोर्सजवळ ‘बिझनेस बे’लगत हे अलिशान हॉटेल साकारले आहे
तनाएराचे महाराष्ट्रातील पहिले दालन पुण्यात सुरू पुणे : देशभरातील हातमागावरील साड्या उपलब्ध करून देणाऱ्या टायटन कंपनीच्या तनाएरा ब्रँडचे महाराष्ट्रातील पहिले दालन पुण्यात सुरू झाले आहे. औंधमधील पुष्पक पार्क येथील या दालनाचे उद्घाटन अभिनेत्री श्रुती मराठे हिच्या हस्ते झाले. या वेळी तनाएराच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राजेश्वरी श्रीनिवासन उपस्थित होत्या.
एक नोव्हेंबरपासून सरकारी बँकांच्या वेळेत बदल पुणे : एक नोव्हेंबर २०१९पासून सर्व सार्वजनिक बँकांच्या कामकाजाच्या वेळा एकसारख्या होणार आहेत. केंद्र सरकारच्या ‘ईज (इएएसइ) 2.0’ अन्वये बँकिंगमधील सुधारणांअंतर्गत हा बदल करण्यात येणार आहे.
‘रेरा’मधील नवीन तरतुदी स्पष्ट कराव्यात : ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ची मागणी पुणे : महाराष्ट्रात रेरा कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी ज्या गृहप्रकल्पांना पूर्णत्त्वाचा दाखला किंवा भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त झाले आहे, त्यांची रेरा कायद्याअंतर्गत नोंदणी करणे आतापर्यंत आवश्यक नव्हते; मात्र महसूल विभागाने नुकत्याच जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार ही नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language